सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकांत वाढ

मुंबई – जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळे आणि अर्थसंकल्पाबाबत गुंतवणूकदार आशावादी झाल्यामुळे शेअरबाजार निर्देशांकांत सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली.

नैसर्गिक वायू, माहिती तंत्रज्ञान आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाली. मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 129 अंकांनी वाढून 39,816 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 44 अंकांनी वाढून11,910 अंकांवर बंद झाला. यस बॅंकेच्या 1200 कोटी रुपयांच्या व्याजावर परिणाम झाल्यामुळे या बॅंकेचा शेअर 7.6 टक्‍क्‍यांनी कोसळला. आज झालेल्या खरेदीचा फायदा माहिती तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांना झाला. मिडकॅप 0.6 टक्‍क्‍यांनी वाढला मात्र स्मॉल कॅप कालच्या पातळीवर स्थिर राहिला. काल परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 426 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.

Leave a Comment