IND vs AUS Final :”…म्हणून सामन्यापूर्वी अहमदाबादेतील विमानतळ राहणार ४५ मिनिटे बंद” ; प्रशासनाने दिले कारण

IND vs AUS Final: गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. 1 लाख 30 हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये हा सामना पार पडत आहे. देशभरात तर उत्साहाचं आणि उत्सुकतेचं वातावरण आहे. दरम्यान, सामन्याला सुरुवात होण्याआधी अहमदाबादेतील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ आज दुपारी १.२५ ते २.१० पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. विमानतळ बंद ठेवण्याचे कारणही प्रशासनाने दिले आहे.

सरदार वल्लभभाई पटेल विमानतळाने शनिवारी रात्री एक निवेदन जारी केले. त्यानुसार, दुपारी १.२५ ते २.१० पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात भारतीय वायुसेनेचा एअर शो होणार आहे. याकरता विमानतळ ४५ मिनिटे बंद राहणार आहे.


तसेच, या काळात अहमदाबादेत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. विमातळावरील प्रवाशांच्या सुविधेसाठी टर्मिनल आणि लँडसाइड येथे प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने येथे सर्व सुरक्षा पथके तैनात करण्यात आले आहेत.

Akasa Air Airlines ने देखील निवेदन जारी केले आहे. अहमदाबाद येथे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे शहरातून येणार्‍या आणि निघणार्‍या फ्लाइटला विलंब होऊ शकतो, असे एअरलाईनने सांगितले आहे.