T20 World Cup 2024 : पाकिस्तानचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; भारताविरूध्द प्लेइंग 11 मध्ये केला मोठा बदल…

T20 World Cup 2024 (IND vs PAK Playing XI Update) : आज टी-20 विश्वचषक 2024 च्या 19 व्या सामन्यात भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होत आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना होणार आहे. मागील सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ येथे पोहोचला आहे, तर गेल्या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आज दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यातील महान सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आणि त्यामुळे टाॅसला उशीर झाला आहे. सामन्याचा टाॅस हा 7.30 वाजता होणार होता, मात्र भारत-पाकिस्तान यांच्यातील महान सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आणि त्यामुळे नाणेफेकीला उशीर झाला. दरम्यान, पंचानी पुन्हा खेळपट्टीची पाहणी केल्यानंतर 8 वाजता टाॅस आणि 8.30 वाजता सामना होणार असल्याची घोषणा केली.

तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा  (Toss Update) पाकिस्तान संघाच्या बाजूनं लागला आहे. पाकचा कर्णधार बाबर आझम याने भारताविरुद्ध नाणेफेक गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (WT20 2024 : Pakistan Won the Toss & elected to Field) त्यामुळे भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरावे लागेल.

बाबर आझमचा संघ आज एका बदलासह दाखल झाला आहे. आझम खानच्या जागी इमाद वसीमचे संघात पुनरागमन झाले आहे. भारतीय संघात कोणताही बदल केलेला नाही. बाबर म्हणाला की, ढगाळ वातावरण (overcast condition) आहे आणि त्यांच्या चार वेगवान गोलंदाजाना त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

IND vs PAK Live Score: दोन्ही संघांची प्लेइंग-11 खालीलप्रमाणे…

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

पाकिस्तान : मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम (कर्णधार), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद अमीर.

दरम्यान, टी-20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानविरुद्ध उत्कृष्ट विक्रम आहे. 2007 पासून या स्पर्धेत दोन्ही संघ सात वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारताने सहा वेळा तर पाकिस्तान संघाने एकदा विजय मिळवला आहे. त्याच वेळी, एकूण टी-20 मध्ये दोन्ही संघांमध्ये 12 सामने झाले आहेत. भारताने आठ वेळा आणि पाकिस्तानने तीन वेळा विजय मिळवला आहे. 2007 मध्ये, एक सामना टाय झाला होता, जो टीम इंडियाने बाॅल आउटमध्ये जिंकला होता. म्हणजेच टीम इंडियाने एकूण 12 पैकी नऊ जिंकले आहेत.