IND vs SA 2nd Test : केपटाऊनला गोलंदाजांचा कस लागेल – अलन डोनाल्ड

केपटाऊन – सेंच्युरीयनची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी पोषक असते मात्र, केपटाऊनची खेळपट्टी फलंदाजीसाठी मदत करते. त्यामुळे बुधवारपासून सुरु होत असलेल्या दुसऱ्या कसोटीत भारत व दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघातील गोलंदाजांचा कस लागेल, असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व वेगवान गोलंदाज अलन डोनाल्ड याने व्यक्त केले आहे.

पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी ज्या पद्धतीने भारतीय फलंदाजांवर वर्चस्व राखले ते पाहता या कसोटीतही भारतीय फलंदाज दडपणाखालीच दिसतील. या उलट यजमान संघ जास्त त्वेषाने खेळेल कारण त्यांना या सामन्यासह ही मालिका जिंकण्याची संधी आहे. दुसरीकडे भारतीय फलंदाजांनी त्यांचे वर्चस्व राखले तर मात्र, सामन्याचा निकाल वेगळा ठरेल, असेही सुतोवाच डोनाल्डने केले.

दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी 3 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे. केपटाऊनमध्ये उभय संघांमधील सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल. सध्या भारतीय संघ 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहे.

IND vs SA 2nd Test : मालिकेत बरोबरी साधण्याच्या इराद्याने टीम इंडिया उतरणार मैदानात,जाणून घ्या…लाइव स्ट्रीमिंग, पिच रिपोर्ट आणि प्लेइंग-11 सह सर्व डिटेल्स…

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव केला होता. मात्र, मालिकेत बरोबरी साधण्याच्या इराद्याने भारतीय संघ केपटाऊनमध्ये दाखल होणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मालिका जिंकायची आहे.