‘पंतप्रधानांनी पुस्तक विक्रेत्यांचे वाटोळे केले’, इंदापूरातील पुस्तक विक्रेता थेट पीएम मोदींवर संतापला

इंदापूर – शहरातील श्रेयश व्हरायटीज, नारायणदास रामदास हायस्कूलच्या गाळ्यात असलेल्या पुस्तक विक्रेत्याने शासनाचे काय खरे आहे, पुस्तकाच्या किमती मोदींनी वाढवल्या, तरीही शासकीय पुस्तके फाटकीच येतात, असा त्रागा करत ग्राहकांवर चिडण्याचा प्रकार केला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, पुणे-इंदापुरात राष्ट्रीय महामार्गावर नारायणदास रामदास हायस्कूल असून या हायस्कूलच्या गेटवरच या पुस्तक विक्रेत्याचे दुकान आहे. आजपर्यंत कुणालाही जीएसटीची बिले दिली जात नाहीत. हलक्या प्रतीच्या वह्या विक्रीसाठी उपलब्ध असतात. अनेक विद्यार्थी व पालक येथील वह्या पुस्तके खरेदी केल्यानंतर पश्चाताप व्यक्त करतात.

सोमवार (ता.22 एप्रिल)रोजी एक ग्राहक आठवीचे स्कॉलरशिप भाग एक खरेदीसाठी आले होते. एकतर या दुकानात जुना स्टॉक कुठून आणतात त्याची कल्पना नाही. परंतु फाटलेली काही पुस्तके ग्राहकांच्या माती मारली जातात. यावरती त्या ग्राहकाने विचारले असता देशाच्या पंतप्रधानाने पुस्तक विक्रेत्यांचे वाटोळे केले, अशी प्रतिक्रिया संबंधित विक्रेत्यांनी दिली.

शासन आमच्याकडून वारेमाप पैसे घेते. परंतु फाटकी पुस्तके देते. यावर आमचा इलाज नाही, अशी ही खंत या दुकानदाराने व्यक्त केली. शाळेच्या गेटवरच हे दुकान असल्यामुळे विद्यार्थ्यांना नाईलाज असतो. शालेय साहित्य खरेदी करावे लागते. मात्र शासन नियमानुसार येथील पुस्तकांचा व्यवहार चालतो का ?, शासनाचा जीएसटी कोण बुडवते याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे. यातच या दुकानात बाल चिमुरड्यांची गर्दी अधिक असते. शाळेच्या चतुर्थ श्रेणी शिपाई बांधवांना कामगारांना देखील, या दुकानांमुळे जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांना रस्त्याच्या पलीकडे सोडावे लागते.