चिंता वाढली: महाराष्ट्रातील कोरोनामुक्तांना पुन्हा बाधा झाल्याचं उघड

मुंबई – कोरोनाचा संसर्ग झालेला व्यक्ती उपचार घेऊन बरा झाल्यानंतर त्याला दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग होतो का असा अनेकांना प्रश्न पडतो. गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग बाबत वेगवेगळी माहिती समोर येत आहे. आता भारतात तीन जणांना दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दुसऱ्यांदा होणारा कोरोनाचा संसर्ग हा जास्त गंभीर असल्याची धक्कादायक माहिती एका संशोधनातून समोर आली आहे.

भारतात दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झालेल्या तीन जणांमध्ये मुंबईतील दोघांचा तर अहमदाबादमधील एकाचा समावेश आहे. कोरोनाचा पुन्हा संसर्ग होऊ शकतो आणि त्याची लक्षणं ही अधिक गंभीर होतात असं लॅसेंट या वैद्यकिय नियतकालीकात कोरोनाच्या संक्रमणाबाबत प्रकाशित करण्यात
आलेल्या अहवालात म्हटलं आहे.

युएसच्या नेवाडातील एका 25 वर्षीय तरूणाला एप्रिलमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला होता. काही दिवस क्वारंटाइनमध्ये राहिल्यानंतर स्थितीत सुधारणा झाली. त्यानंतर त्याच्या दोन आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्या. मात्र, 48 दिवसानंतर ती व्यक्ती पुन्हा कोरोना संक्रमीत झाल्याचं दिसून आलं.  रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला ऑक्सिजन सपोर्टची देखील  वश्यकता
भासली असे रिपोर्ट मध्ये सांगण्यात आलं आहे.

आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांनी सागितले की, एकदा संसर्ग होऊन गेल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रिइन्फेक्शन होते याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने कोणतीही माहिती दिलेली नाही.

Leave a Comment