‘मतमोजणी’च्यावेळी ‘इंडिया’ आघाडी दक्ष राहणार

चेन्नई  – उद्या होणाऱ्या मतमोजणीच्या प्रक्रियेत इंडिया आघाडीचे सर्वच पक्ष अतिशय दक्ष राहणार आहेत असे द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) नेते आरएस भारती यांनी म्हटले आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विजयाचा अंदाज वर्तवणारा एक्झिट पोल म्हणजे एक भूलथाप आहे आणि ते केवळ मोदी सर्वेक्षण आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

एक्झिट पोल केवळ काही तासांसाठी अस्तित्वात आहे असेही त्यांनी म्हटले आहे. तामिळनाडूमध्ये काँग्रेसने फक्त ९ जागा लढवल्या होत्या, पण एक्झिट पोल मध्ये कॉंग्रेस १३ जागा जिंकत असल्याचे दाखवण्यात आले आहे, हे मोदींचे सर्वेक्षण आहे. त्यामुळे आम्ही मतमोजणीवर लक्ष केंद्रीत करणार आहोत असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, एक्झिट पोलने तामिळनाडूमध्ये एनडीएच्या मतांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे जी २२ टक्क्यांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येथे भाजप प्रणित एनडीएला २ ते ४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.