T20 World Cup 2024 : भारत-पाक 8व्यांदा T20 विश्वचषकात भिडणार..! कधी आणि कुठे पाहणार फ्रीमध्ये सामन्याची Live Streaming, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स….

T20 World Cup 2024, IND vs PAK : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये 2 जूनपासून खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची पहिली तुकडी न्यूयॉर्कला पोहोचली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी संघाच्या न्यूयॉर्कमध्ये पोहचल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. आतापर्यंत टी-20  विश्वचषकात आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान सात वेळा आमनेसामने आले आहेत. यंदा टी- 20 विश्वचषक 2024 मध्ये ते आठव्यांदा एकमेकांविरूध्द भिडतील. पण, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भारतात किती वाजता सुरू होईल ,भारत-पाक सामना विनामूल्य कुठे पाहता येईल या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

टी-20 विश्वचषक 2024 ही स्पर्धा 2 जूनपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. भारत आणि पाकिस्तानला अ गटात ठेवण्यात आले आहे. टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

भारत-पाकिस्तान सामना अमेरिकेच्या वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरू होईल. भारतीय लोकांना वर्ल्ड कप मॅच टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येणार आहे. तर मोबाईल आणि टॅबलेट वापरकर्ते डिस्ने हॉटस्टार ॲपवर थेट प्रक्षेपणाचा (Online live Streaming) आनंद घेऊ शकतील.

T20 World Cup 2024 : आयपीएल संपली, आता टी-20 वर्ल्ड कपचा थरार होणार सुरु, जाणून घ्या Team India च्या सामन्याचं संपूर्ण वेळापत्रक…

बीसीसीआयने 30 एप्रिल रोजी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. रोहित शर्मा संघाचा कर्णधार असेल तर हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. पीसीबीने 24 मे रोजी आगामी विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला. बाबर आझमकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. T20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत 7 वेळा आमनेसामने आले आहेत. भारतीय संघ 5 वेळा जिंकला आहे, पाकिस्तानने एकदा विजय मिळवला होता आणि त्यांचा एक सामना बरोबरीत राहिला होता. दरम्यान, विश्वचषकात भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. पाकिस्तान संघाचा पहिला सामना 6 जून रोजी अमेरिकेशी होणार आहे.