Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 1 हजार पेक्षा जास्त जणांचा मृत्यू; 1 लाख 72 हजार 433 नवीन रुग्ण

नवी दिल्ली – कालच्या तुलनेत आज देशात प्राणघातक करोना व्हायरस साथीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात करोना विषाणूचे 1 लाख 72 हजार 433 नवीन रुग्ण आढळले असून 1 हजार 8 जणांचा मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेत आज करोनाचे 6.8 टक्के जास्त रुग्ण आढळले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आता देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 15 लाख 33 हजार 921 वर आली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 98 हजार 983 झाली आहे. आकडेवारीनुसार, 2 लाख 81 हजार 109 लोक बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 3 कोटी 97 लाख 70 हजार 414 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.