T20 World Cup 2024 : केएल राहुलला टीम इंडियात नाही मिळाली जागा..! जाणून घ्या, काय आहे मुख्य कारण…

KL Rahul T20 World Cup 2024 : केएल राहुलला 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळालेले नाही. राहुल फॉर्ममध्ये असून चांगली कामगिरी करत आहे. मात्र असे असूनही त्याला टीम इंडियात स्थान मिळू शकले नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी T20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा केली. यात यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संघात जागाच नसल्याने राहुलला संधी मिळालेली नाही.

राहुल आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळतो. तो संघाचा कर्णधारही आहे. राहुलने आयपीएलच्या या मोसमात 9 सामने खेळले असून 378 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 3 अर्धशतके झळकावली आहेत. राहुलची सर्वोत्तम कामगिरी 82 धावांची आहे. तो फॉर्मात आहे. मात्र असे असतानाही बीसीसीआयच्या निवड समितीने राहुलची टी-20 विश्वचषकासाठी निवड केली नाही.

राहुल टीम इंडियात का स्थान मिळवू शकला नाही?

टीम इंडियाने ऋषभ पंत आणि संजू सॅमसनला विकेटकीपिंगसाठी स्थान दिलं आहे. पंत आणि सॅमसन दोघेही स्फोटक फलंदाजीत माहिर आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे आयपीएल 2024 मध्ये या दोघांची कामगिरी राहुलपेक्षा थोडी चांगली झाली आहे. पंतने 11 सामन्यात 398 धावा केल्या आहेत. तर सॅमसनने 9 सामन्यात 385 धावा केल्या आहेत. स्ट्राईक रेटच्या बाबतीत पंत-सॅमसन राहुलच्या पुढे आहेत. बोर्डाने पंत आणि सॅमसन या दोघांना प्राधान्य दिले आहे. यानंतर तिसऱ्या यष्टिरक्षक फलंदाजाला संघात जागा न नसल्यामुळे  राहुलची निवड झाली नाही.

T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा..! रोहितकडे नेतृत्व तर पांड्याकडेही महत्त्वाची जबाबदारी, पहा कोणा-कोणाला मिळाली संधी…

राहुल 2022 पासून भारताच्या T20 संघाबाहेर …

केएल राहुलचा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. त्याने भारतासाठी 72 टी-20 सामने खेळले आहेत. या कालावधीत 2 हजार 265 धावा केल्या आहेत. राहुलने या फॉरमॅटमध्ये 2 शतके आणि 22 अर्धशतके केली आहेत. त्याने 75 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2 हजार 820 धावा केल्या आहेत. राहुलने वनडे फॉरमॅटमध्ये 7 शतके आणि 18 अर्धशतके केली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे राहुल 2022 पासून भारताच्या T20 संघातून बाहेर आहे.