ACC U19 Asia Cup 2023 : आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर; पंजाबच्या उदयकडे संघाचे नेतृत्व…

ACC Men’s U19 Asia Cup India’s Squad : भारतीय क्रिकेट संघटना अर्थात बीसीसीआयने 19 वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. पंजाबकडून खेळणाऱ्या उदय सहारनकडे या संघाची कमान सोपवण्यात आली आहे.

दुबईच्या यजमानपदावर ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेला 8 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे, तर अंतिम सामना रविवारी 17 डिसेंबर रोजी होणार आहे. भारत हा अंडर-19 आशिया करंडक स्पर्धेचा गतविजेता संघ आहे. विशेष गोष्ट म्हणजे, भारतीय संघ हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. कारण, भारताने सर्वाधिक 8वेळा या करंडकावर आपले नाव कोरलेले आहे.

भारतीय संघ –

अर्शिन कुलरनी, आदर्श सिंह, रुद्र पटेल, सचिन, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेल्ली अवनीश राव, सौम्य कुमार, मुर्गन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौड, आराध्या शुक्ला, नमम तिवारी, राज लिंबानी.

Mitchell Marsh : विश्वचषक ट्रॉफी वादात अडकला मिशेल मार्श; अडचणीत वाढ होण्याची शक्यता…

दरम्यान, भारतीय संघात मुशीर खान याला देखील संधी मिळाली आहे, जो रणजी ट्रॉफी गाजवणाऱ्या सर्फराज खानचा भाऊ आहे.
सर्फराज खान हा भारतीय देशांतर्गत क्रिकेटचा स्टार खेळाडू आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्येही त्याने चमक दाखवली आहे. सध्या तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. मात्र दुर्दैवाने चांगली कामगिरी करूनही सर्फराजला भारतीय संघात स्थान मिळू शकलेले नाही. सर्फराजने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. तो भारतीय अंडर-19 संघाकडून क्रिकेट खेळला आहे. तर आयपीएलमध्ये तो पंजाब किंग्ज (पीबीकेएस) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) कडूनही खेळला आहे.