भारतीय लष्कराचा अधिकारी पाकिस्तानी माऱ्यात शहीद

जम्मू – पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधी भंगाचे सत्र चालू ठेवत सोमवारी भारतीय हद्दीत मारा गेला. त्यामध्ये भारतीय लष्कराचा एका अधिकारी शहीद झाला. ती घटना जम्मू-काश्‍मीरमध्ये नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत घडली.

पाकिस्तानी सैनिकांनी राजौरी आणि पूँच जिल्ह्यांमध्ये गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला. त्यांनी राजौरीच्या नौशेरा क्षेत्रातील भारतीय सीमा ठाण्यांना लक्ष्य केले. त्यामध्ये भारतीय लष्कराचा एक अधिकारी मृत्युमुखी पडला.

पाकिस्तानी माऱ्याला भारतीय जवानांनी जबर प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी माऱ्यात चालू महिन्यात भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि तीन जवान मिळून चौघे शहीद झाले.

याआधी 1 ऑक्‍टोबरला पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या कुरापतीमध्ये 3 भारतीय जवानांना प्राण गमवावे लागले होते. ती घटना कुपवाडा जिल्ह्यात घडली होती.

Leave a Comment