थायलंड स्पर्धेसाठी भारतीय बॅडमिंटन संघ रवाना

नवी दिल्ली  – थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारताचा तगडा संघ रवाना झाला. फुलराणी सायना नेहवाल, ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू या प्रमुख खेळाडूंकडून देशाला सरस कामगिरीची आशा आहे. मात्र, पुरुष एकेरीत नवोदित मात्र, अव्वल खेळाडू लक्ष्य सेन याने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे.

सराव करत असताना लक्ष्यला पाठीच्या दुखापतीचा त्रास जाणवू लागला. गेल्या वर्षी पाच जेतेपद मिळवणाऱ्या लक्ष्यला डॉक्‍टरांनी पाठीच्या दुखापतीनंतर विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे लक्ष्य थायलंडमधील दोन स्पर्धांमध्ये खेळू शकणार नाही. थायलंडमध्ये 12 ते 17 जानेवारीदरम्यान तसेच 19 ते 24 जानेवारीदरम्यान दोन स्पर्धा रंगणार आहेत.

भारतीय संघात सात्त्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या दुहेरीतील जोडीसह अश्‍विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी या महिला जोडीचाही समावेश आहे. तसेच एच. एस. प्रणॉय, पारुपल्ली कश्‍यप, समीर वर्मा, ध्रूव कपिला, मनू अत्री हेसुद्धा हैदराबादहून बॅंकॉकला रवाना झाले आहेत.

Leave a Comment