भारतीय नौदलाचे जहाज शिवालिक सिंगापूरहून रवाना

सिंगापूर – आयएनएस शिवालिक हे दक्षिण चीन समुद्र आणि प्रशांत महासागरात तैनात करण्यात आलेले भारतीय नौदलाचे जहाज ३० मे रोजी सिंगापूरहून जपानच्या योकोसुका येथे जाण्यासाठी निघाले. सिंगापूर येथे जहाजाच्या थांब्यादरम्यान विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते.

त्यात चांगी नौदल तळावरील बेस कमांडर यांची भेट, क्रांजी युद्ध स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करणे, सिंगापूरमधील भारताच्या उच्चायुक्तांशी भेट, आयएफसी भेट, जहाजावरील सुमारे ८० शाळकरी मुलांची आयएनएस शिवालिकला भेट भारतीय आणि ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांची जहाजावरील भेट तसेच युएसएस मोबाइलला क्रॉस-डेक भेटी यांचा समावेश होता.

आयएनएस शिवालिक, सिंगापूरहून निघाल्यावर जिमॅक्स -२४ आणि रिम्पॅक-२४ या युद्धसरावांमध्ये सहभागी होणार आहे. या तैनातीचा उद्देश जिमॅक्स-२४ अमेरिकन नौदल आणि रिमपॅक-२४ मध्ये सहभागी होणाऱ्या इतर भागीदार नौदलांसोबत सराव आणि क्षमता वाढवणे हा आहे.