भारतीय नौदलाच्या ‘खंजर’ने वाचवले ३६ मच्छीमारांचे प्राण; समुद्रात भरकटले होते ३ मासेमारी जहाज

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात भारतीय मच्छीमार भरकटले असताना त्यांच्या मदतीसाठी भारतीय नौदल धावून आल्याची घटना समोर आली आहे. बंगालच्या उपसागरात तामिळनाडू किनाऱ्यापासून १३० नॉटिकल मैल अंतरावर ३ मासेमारी जहाज अडकले होते. भारतीय नौदल जहाज ‘खंजर’ने या जहाजांवरील ३६ भारतीय मच्छिमारांना सुखरूप परत आणले.

भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार,”खराब हवामान, इंधन, तरतुदी आणि इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे दोन दिवसांपासून समुद्रात अडकलेल्या मच्छिमारांना २८ जुलै रोजी चेन्नई बंदरात परत आणण्यात  आल्याचे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी भारत सरकारचे संशोधन जहाज समुद्रात भरकटले होते. भारतीय तटरक्षक दलाच्या समयसूचकतेमुळे जहाज दुर्घटना होण्यापासून वाचविण्यात यश आले. एनआयओच्या संशोधन मोहिमेवर असलेल्या जहाजाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता. हे जहाज कारवारजवळ धोकादायकपणे वाहून जात होते. ते खडकाळ भागाला धडकण्यापासून वाचविण्यात तटरक्षक दलाल यश आले.

बोर्ड आर. व्ही. सिंधू साधना नामक जहाज ०३ नॉट्स वेगात व्ह्यू इंजिन बंद पडलेल्या स्थितीत सापडले. जेव्हा जहाजाचा डिस्ट्रेस सिग्नल मिळाला तेव्हा ते जमिनीपासून अंदाजे २० नॉटिकल मैल दूर होते. या जहाजामध्ये आठ प्रतिष्ठित आणि उच्चपदस्थ शास्त्रज्ञ आणि एकूण ३६ कर्मचारी होते.