Adani scam : अदानी घोटाळा प्रकरणामुळे देशाच्या प्रतिष्ठेला बाधा – मायावती

लखनौ – अदानी घोटाळा प्रकरणाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होईल. सरकारने या देशातील जनतेला या मुद्द्यावर विश्‍वासात घेतले पाहिजे, पण ते घेत नाहीत, हे “दुर्दैवी” आहे. या घोटाळा प्रकरणामुळे भारताच्या प्रतिष्ठेला बाधा पोचली आहे, असा आरोप बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी केला आहे.

मायावती यांनी म्हटले आहे की, आज रविदास जयंतीच्या दिवशी अदानी प्रकरणाचा विसर कसा पडू शकतो? हे चिंतेचे एक नवे प्रकरण आहे. अशा प्रकरणांवर तोडगा काढण्याऐवजी सरकार जनतेकडे दुर्लक्ष करीत आहे.

अदानी प्रकरणामुळे भारताची प्रतिमा धोक्‍यात आली आहे आणि प्रत्येक जण या प्रकरणावर चिंता व्यक्त करीत आहे. सरकार मात्र हे प्रकरण फारशा गांभीर्याने घेताना दिसत नाही, असे मायावती यांनी म्हटले आहे.

Bengal : पश्‍चिम बंगालमधील स्फोटात तृणमूलचा कार्यकर्ता ठार; कुटुंबीयांनी कॉंग्रेस…

एका व्यावसायिकामुळे भारताचे आर्थिक वातावरण हताश, निराश आणि नैराश्‍याने ग्रासले आहे. त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामान्य जीवनावर दीर्घकालीन परिणाम होणार आहे. सरकार लोकांच्या विश्‍वासाशी खेळ करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला.