औद्योगिक उत्पादन नकारात्मक पातळीवर

नवी दिल्ली – तिसऱ्या तिमाहीत विकास दर सकारात्मक पातळीवर गेल्यामुळे म्हणजे शून्य टक्‍क्‍यापेक्षा जास्त झाल्यामुळे आशादायक वातावरण निर्माण झाले होते. मात्र औद्योगिक उत्पादनाने आणखी गती घेतली असल्याचे दिसून येत नाही.

जानेवारी महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादन उणे 1.6 टक्के इतके नोंदले आहे. मनुफॅक्‍चरिंग क्षेत्राची उत्पादकता लॉकडाउनच्या काळामध्ये कोसळली होती. या उत्पादकतेत आणखीही उभारी आलेली नाही.
जानेवारी महिन्यात मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्राची उत्पादकता उणे दोन टक्के इतकी नोंदली गेली आहे. खाण क्षेत्राची उत्पादकता उणे 3.7 टक्के इतकी झाली आहे. ऊर्जा उत्पादन 5.5 टक्‍क्‍यांनी वाढले आहे.

या क्षेत्रातील उत्पादकता वाढण्यासाठी केंद्र सरकार बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करीत आहे.
मात्र या प्रयत्नांना अजूनही यश आल्याचे दिसून येत नाही. आता आर्थिक वर्षाचे फक्त दोन महिने उरले आहेत. या काळात उत्पादन कितीही वाढली तरी त्याचा वार्षिक उत्पादकतेवर नकारात्मक परिणाम कायम राहणार आहेत.

Leave a Comment