#INDvAUS : विलगीकरण कालावधी कमी व्हावा – गांगुली

कोलकाता – भारतीय संघ येत्या नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यावर लगेचच करोनाच्या निर्बंधांनुसार सर्व खेळाडू व सपोर्ट स्टाफ यांना विलगीकरण कक्षात राहावे लागणार आहे.

मात्र, हा कालावधी 14 दिवसांऐवजी कमी दिवसांचा असावा, अशी अपेक्षा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केली आहे. खेळाडू दोन आठवडे हॉटेलमध्येच राहणार असून तो काळ अत्यंत खडतर असेल, तसेच खेळाडूंची मानसिकताही त्यामुळे नकारात्मक होण्याचा संभव असतो. त्यामुळे हा विलगीकरणाचा कालावधीही कमी होऊ शकेल, असे मतही गांगुली यांनी व्यक्त केले.

Leave a Comment