#INDvENG : पंच चुकला, कोहली चीडला

चेन्नई – पंच नितिन मेनन यांनी या डावातही इंग्लंडसाठी पंचगिरी केली का अशी शंका येत आहे. फिरकी गोलंदाज अक्‍सर पटेल याने टाकलेल्या चेंडूवर इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट बॅकफुटवर खेळला होता. यावेळी पायचितचे अपीलही करण्यात आले पण पंच मेनन यांनी हे अपिल फेटाळले.

त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने डीआरएस घेतला. त्यात चेंडू बॅटला लागण्यापूर्वी ऑफ स्टंम्पसमोर रूटच्या उजव्या पायाला लागल्याचे स्पष्ट दिसले मात्र, तरीही अम्पायर कॉलचा फायदा रूटला मिळाला व पंच मेनन यांनी नाबाद ठरवले.

यावेळी कोहली संतापला व त्याने पंचांशी हुज्जतही घातली. जर पंचांच्या निर्णयावर डीआरएस घेण्याची मुभा असूनही मैदानावरील पंचांचा निर्णय कायम ठेवला जाणार असेल तर त्याचा उपयोग नाही, अशा शब्दात नेटकऱ्यांनी आपली मते व्यक्त केली आहेत.

Leave a Comment