#INDvNZ 1st T20I : गप्टील-चॅम्पमनची फटकेबाजी, भारतासमोर 165 धावांचे आव्हान

जयपूर – मार्टिन गप्टील आणि  मार्क चॅम्पमन यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या टी-20  सामन्या मध्ये न्यूझीलंडने भारतीय संघाला (India vs New Zealand 1st T20 ) विजयासाठी 165 धावाचं आव्हान दिलं आहे.  नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीस आलेल्या न्यूझीलंडने 20 षटकांमध्ये 6 गडी गमावत 164 धावा केल्या.

न्यूझीलंड संघाकडून मार्टिन गप्टीलने (Martin Guptill) 42 चेंडूमध्ये सर्वाधिक 70 धावा तर त्या पाठोपाठ मार्क चॅम्पमन याने (Mark Champman) 50 चेंडूमध्ये 63 धावा केल्या. त्यांनतर न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजांला चांगली खेळी करता आली नाही. डॅरेल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स हे फलंदाज शून्यावर बाद झाले.

भारताकडून भुवनेश्वर कुमार (Bhuvnehswar Kumar) आणि आर.अश्विन (R Ashwin) सगळ्यात यशस्वी गोलंदाज ठरले. भुवनेश्वर कुमारने 4 षटकांमध्ये 24 धावा देत  2  बळी घेतले, तर अश्विनने 4 षटकांमध्ये 23 धाव देताना 2 गडी बाद केेले. मोहम्मद सिराज आणि दीपक चहरला एक गडी बाद करण्यात यश आलं.