महागाई वाढली! अन्नधान्याच्या किमती वाढल्याचा परिणाम

नवी दिल्ली – फेब्रुवारी महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित महागाई निर्देशांक वाढून 5.03 टक्के इतका नोंदला गेला आहे. एक महिन्यापासून महागाई वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. ती आता खरी ठरू लागली आहे.

अन्नधान्याच्या किमती वाढल्यामुळे एकूणच महागाईच्या आकडेवारीवर परिणाम झाला असल्याचे दिसून येते. जानेवारी महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा निर्देशांक 4.06 होता.
त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात कपात करणचे टाळून व्याजदर स्थिर ठेवले होते. नवी आकडेवारी पाहता रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करण्याच्या शक्‍यतेवर विचार करू शकते, असे समजले जाऊ लागले आहे.

फेब्रुवारी महिन्यात अन्नधान्याच्या किमती 3.87 टक्‍क्‍यानी वाढल्या आहेत. त्याचबरोबर इंधन आणि ऊर्जेच्या किमती वाढल्या असल्याचे दिसून आले. रिझर्व्ह बॅंकेने किरकोळ किमतीवरील महागाई 4 टक्‍क्‍यांच्या आत रोखण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. मात्र गेल्या दोन महिन्यापासून महागाई रिझर्व्ह बॅंकेच्या उद्दिष्टापेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Comment