सोलापूर बाजारपेठेत ५४ हजार क्विंटल कांद्याची आवक

सोलापूर – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत‎ कांद्याची आवक होण्याचे प्रमाण राज्यात ‎‎सर्वाधिक असून कांद्यासाठी प्रसिद्ध‎ असलेल्या नाशिकसह पुणे आणि मुंबई‎बाजार समिती पेक्षाही सोलापुरात कांदा‎ आवक अधिक आहे. गुरुवारी राज्यातील‎ बाजार समित्यांच्या तुलनेत सोलापुरात ‎सर्वाधिक ५४ हजार क्विंटल कांद्याची‎ आवक झाली. शिवाय इतर बाजार‎ समित्यांच्या तुलनेत भावही समाधानकारक‎ होते.

गेल्या २० वर्षांत सोलापूर बाजार ‎‎समितीमध्ये महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश,‎कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान ‎‎आणि दिल्लीतील व्यापारी कांदा खरेदी करत ‎‎असल्याने आवक तर वाढलीच, शिवाय‎कांद्याचे भावही इतर बाजार समित्यांच्या‎तुलनेत चांगले राहिले आहेत.‎

राज्यात इतर‎ बाजार समित्यांच्या तुलनेत सर्वाधिक भाव‎मिळत असल्याने सोलापूर जिल्ह्यासह ‎शेजारील धाराशिव, लातूर, पुणे, सांगली, ‎सातारा, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर ‎या जिल्ह्यांतील तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश ‎आणि तेलंगणा या राज्यातील‎ शेतकऱ्यांचा देखील कांदा विक्रीसाठी‎ सोलापूरकडे ओढा आहे.‎

गेल्या काही वर्षांपासून सोलापुरात ‎कर्नाटक, तेलंगण आणि आंध्र प्रदेशातील‎ शेतकरी देखील कांदा आणत आहेत. या‎ शेतकऱ्यांसह येणाऱ्या व्यापाऱ्यांनाही सुविधा‎ देण्याचा आमचा प्रयत्न असतो. इथे कांद्याला‎जो भाव मिळतो तो नाफेडकडेही मिळत‎ नाही. शिवाय आमच्याकडे पैशाची हमी‎ असते. यामुळेच आता कांदा बाजारपेठेसाठी‎ जागा अपुरी पडू लागली आहे, असे सोलापूर‎बाजार समितीचे सभापती आमदार ‎विजयकुमार देशमुख यांनी यावेळी म्हटले.‎

आडत व्यापाऱ्यांचे यश‎
बाजार समितीतील कांद्याच्या आडत ‎व्यापाऱ्यांचा महाराष्ट्रासह बाहेर राज्यांतील‎ व्यापाऱ्यांशीही संपर्क आहे. शिवाय योग्य‎वजन व तत्काळ पट्टी, फसवणूक होणार नाही‎ही काळजी घेतली. तसेच कांद्याला‎प्रतिक्विंटल १०० रुपये ते ३५०० रुपयांपर्यंतचा‎भाव मिळत आहे. सरासरी भाव १७००‎रुपयांपर्यंत आहे. लासलगाव व विंचूर येथे‎ १५५० रुपये भाव मिळाला आहे.‎​