विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून वढू बुद्रुकची पाहणी

कोरेगाव भीमात अभिवादन सोहळ्याची जय्यत तयारी : परिसरात साफसफाई
कोरेगाव भीमा :
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधिस्थळ, गोविंद गोपाळ यांच्या समाधिस्थळासह, विजय रणसस्तंभ परिसर, शिक्रापूर तोरणा पार्किंग, कोरेगाव भीमा, पेरणे फाटा, तुळापूर फाटा येथे भेट देत स्थळ पाहणी केली. तसेच पांडुरंग गायकवाड यांच्याशी संवाद साधला.

याप्रसंगी पोलीस उपअधीक्षक यशवंत गवारी, निरीक्षक हेमंत शेडगे, सहायक निरीक्षक वैभव पवार व इतर अधिकारी उपस्थित होते. कोरेगाव भीमा येथील दोन्ही पुलावर स्वच्छता करण्यात आली असून प्रशासनाच्या वतीने 1 जानेवारीच्या अभिवादन सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. तसेच नवीन पुलाला रंग देण्यात येत आहे.

कोरेगाव भीमा येथील एस टी महामंडळाच्या जागेची साफ सफाई करण्यात आली असून मोठा पोलीस फौज फाटा, अग्निशमन दलाच्या गाड्या व पीएमपीएमएल बसेस वळवण्यासाठी व वैद्यकीय मदत केंद्र याठिकाणी सुरू असते. यासाठी येथील स्वच्छता प्रशासनाच्या वतीने करण्यात आली