पुणे जिल्हा | संभाजीमहाराजांचे कर्तृत्ववान चरित्र प्रेरणादायी- ॲड. राहुल तावरे

माळेगाव, (वार्ताहर)- एकही युद्ध न हारणारे जगातील महापराक्रमी राजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होय त्यांचे कर्तृत्ववान चरित्र प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार ॲड. राहुल तावरे यांनी काढले.

बारामती तालुक्यातील माळेगाव येथील संभाजीनगर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या पुतळ्यास हार घालून पूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते

यावेळी सतीश गावडे, विशाल घोडके, पप्पू खरात, निलेश खोमणे, मुरली खरात उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन धर्मवीर संभाजीराजे जयंती महोत्सव समितीचे तेजस गायकवाड, सागर जाधव, मयुर शिंदे, दादा जराड, स्वप्निल शिंदे, महेश जराड, सूरज भोईटे, सागर शिर्के, निखिल तावरे, मल्हार जराड, विरेंद्र वाबळे, प्रसाद कुदळे, रवींद्र बडदे, अथर्व शिंदे, शुभम जराड, सार्थक गावडे, धीरज भापकर, प्रथमेश भापकर,

शुभम वाघमोडे, महेश जराड व प्रणव गाढवे यांनी केले होते. दरम्यान, नगर पंचायत कार्यालयात मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी प्रशासकीय अधिकारी आदित्य भुतकर, नानासाहेब शितोळे, ओंकार जाधव, अनिल निंबाळकर, शंकर ठोंबरे, राजू शेख, दिलीप जाधव, रेश्मा शेख, माया कदम, शितल चव्हाण, रेश्मा मांढरे, मयुरी माळवदकर आदी उपस्थित होते.