पारगावात तलाठ्यास शिवीगाळ, चौघांवर गुन्हा

मंचर  -पारगाव-शिंगवे येथील सिमेंट वीट ब्लॉक बनवणाऱ्या कारखान्यातील परप्रांतीय मजुरांना जेवण खाण्याची व्यवस्था करा, असे सांगितल्याचा राग आल्याने कारखान्याचे मालक असणाऱ्या चार जणांनी तलाठी संतोष महादू जोशी यांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ केली. मंचर पोलिसांनी चौघा जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पारगाव शिंगवे गावच्या हद्दीतील चिंचगाई मळा येथे इसम कोंडीभाऊ ढोबळे, सचिन ढोबळे, मनोज ढोबळे, प्रमोद ढोबळे सर्व राहणार पारगाव-शिंगवे यांच्याकडे असलेले उत्तर प्रदेशातील दहा ते पंधरा मजूर कामगार सिमेंट वीट ब्लॉक बनविणाऱ्या कारखान्यामध्ये कामाला असलेले मजूर हे अडकून पडलेले होते.

त्यांना जेवण खाण्याची व्यवस्था करण्याबाबत महसूल खात्याचे तलाठी संतोष जोशी सूचना देत असतानाच सिमेंट वीट ब्लॉक बनवणाऱ्या कारखानाच्या मालक असणाऱ्या चार लोकांनी शिवीगाळ दमदाटी करून, तुम्ही आमचे काय वाकडे करणार, तुम्ही आम्हाला सांगणारे कोण? असे म्हणून अंगावर धावून येऊन मी करत असलेले सरकारी कामात अडथळा व प्रतिबंध करून आम्ही कोणाची जेवणाची व्यवस्था करणार नाही, तू जर परत काही सांगायला आला तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.

Leave a Comment