निलेश लंके यांच्यासह चौघांचे उमेदवारी अर्ज दाखल

शिर्डी मतदार संघात आज दोन अर्ज दाखल
नगर – अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी पाच उमेदवारांनी सहा नामनिर्देशनपत्र दाखल केले. उमेदवारी दाखल करण्यासाठी गुरूवार (दि.२५) शेवटची तारीख असून यामुळे यंदा अहमदनगर लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काल आणखी १३ इच्छुकांनी आणखी १५ विकत नेले आहेत. तर शिर्डी मतदार संघात्त २ अर्ज दाखल करण्यात आले आहे.

मंगळवारी नॅशनलिस्ट काॅग्रेस पार्टी वतीने निलेश द्न्यावदेव लंके यांनी २ नामनिर्देशनपत्र दाखल केले. परशुराम सखाराम सोंडकर हे सुचक आहेत. त्यांनी स्वतंत्रपणे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. यासह भाऊसहेब बापुराव वाबळे यांनी भारतीय जवान किसान पार्टी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर नवशाद मुन्सीलाल शेख यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

 

दत्तात्रय आप्पा वाघमोडे यांनी राष्ट्रीय जनक्रांती पक्षाकडून अर्ज दाखल केला. तर गिरीश तुकाराम जाधव यांनी अपक्ष अर्ज दाखल केला असून पाचजणांसह सहा अर्जाचा समावेश आहे. यासह आणखी १३ इच्छुकांनी १५ अर्ज नेलेले असून यात तर शिर्डी लोकसभा मतदार संघात भारत संभाजी भोसले यांनी समता पक्षाकडून अर्ज दाखल केला आहे. तर नितीन दादाहरी पोळ यांनी बहुजन भारती पक्षाकडून अर्ज दाखल केले आहे.

गुरूवारी (दि.२५) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यावर शुक्रवार (दि. २६) रोजी दाखल अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर सोमवार (दि. २९) उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक राहणार आहे. १३ मे रोजी रोजी मतदान तर ४ जून रोजी मतमोजणी होणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागामार्फत कळविण्यात आले आहे.