IPL 2024 Final : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अंतिम सामना खेळणार हे निश्चित! ‘ही’ आकडेवारी पाहिल्यानंतर तुमचाही बसेल विश्वास…

Royal Challengers Bengaluru & IPL Final : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 1 टक्के आशांचे 100 टक्के मध्ये रूपांतर केले आणि IPL 2024 च्या प्लेऑफसाठी पात्रता मिळवली. आता येथून बेंगळुरूचा संघ अंतिम फेरीत पोहोचेल असे वाटते. हे आम्ही नाही तर एका खास आकडेवारीवरून हे स्षष्ट होते. या आकडेवारीमुळे बेंगळुरूने यापूर्वी तीनदा अंतिम फेरी गाठली आहे. आरसीबीचा हा आकडा इतर संघांसाठी खरोखरच चिंताजनक असेल.

खरेतर, जेव्हा-जेव्हा बेंगळुरूने सलग 5 किंवा अधिक सामने जिंकले आहेत, तेव्हा संघाने अंतिम सामना खेळला आहे. बेंगळुरू संघ सलग पाच किंवा त्याहून अधिक सामने जिंकून तीनदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. या आकड्यासह बेंगळुरूने पहिल्यांदा 2009 च्या आयपीएलचा अंतिम सामना खेळला. यानंतर संघाने 2011 आणि नंतर 2016 च्या आयपीएलची फायनल खेळली. मात्र, बेंगळुरूने आतापर्यंत एकदाही फायनल जिंकून विजेतेपद पटकावलेलं नाही.

यावेळी म्हणजे 2024 IPL मध्ये बेंगळुरूने सलग 6 सामने जिंकले आहेत. बेंगळुरूने सलग 6 सामने जिंकूनच प्लेऑफमध्ये प्रवेश केला. अशा परिस्थितीत, यावेळीही सलग पाच विजयांचा आकडा बेंगळुरूला अंतिम फेरीत नेतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

अंतिम फेरी गाठण्यासाठी पार करावे लागतील दोन टप्पे…

फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीला अंतिम फेरी गाठण्यासाठी अजून दोन टप्पे पार करावे लागतील, म्हणजेच जेतेपदाचा सामना खेळण्यासाठी संघाला आणखी दोन विजयांची नोंद करावी लागेल. बेंगळुरूने एकही सामना गमावला तर संघाचा आयपीएलचा प्रवास थांबेल आणि ते अंतिम फेरी गाठू शकणार नाही.

IPL 2024 ( KKR vs SRH Qualifier 1) : कोलकाता हैदराबादशी भिडणार, विजेता थेट फायनलमध्ये तर पराभूत संघाला मिळणार आणखी एक संधी; जाणून घ्या लढतीविषयी सर्व डिटेल्स एका क्लिकवर….

बेंगळुरूने टॉप-4 मध्ये चौथ्या स्थानावर राहून प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे. अशा परिस्थितीत, संघाला तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळावा लागेल, जो बुधवार, 22 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. एलिमिनेटरमध्ये विजयाची नोंद केल्यानंतर, क्वालिफायर-2 मध्ये संघाचा दुसरा सामना पहिला क्वालिफायर-1 गमावलेल्या संघाशी होईल. एलिमिनेटरनंतर, बेंगळुरूला अंतिम फेरीत जाण्यासाठी दुसरा क्वालिफायर देखील जिंकावा लागेल.