IPL 2024 (MI vs SRH Match 55) : मुंबईने हैदराबादविरुद्ध Toss जिंकला, कर्णधार हार्दिकनं घेतला ‘हा’ निर्णय…

IPL 2024 (Mumbai Indians and Sunrisers Hyderabad Match 55, Toss Update) : आयपीएल 2024 चा 55 वा सामना मुंबई इंडियन्स (MI) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात सोमवार, 6 मे रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. हा सामना काहीच वेळाच म्हणजे संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे. या सामन्यात मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्याचा प्रयत्न करेल तर हैदराबादला आपले स्थान मजबूत करायचे आहे.

तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल (Toss Update) हा मुंबई इंडियन्स संघाच्या बाजूनं लागला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत सनरायझर्स हैदराबाद प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या चालू आवृत्तीत मुंबई इंडियन्सची आतापर्यंतची कामगिरी प्रभावी ठरली नाही. मुंबई इंडियन्सने या मोसमात आतापर्यंत 11 पैकी 8 सामने गमावले आहेत. तो सध्या आयपीएल 2024 गुणतालिकेत 6 गुणांसह 9व्या स्थानावर आहे. दुसरीकडे हैदराबादने सुरुवातीपासूनच आपली उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवली. संघाने 10 सामने खेळले, त्यापैकी 6 जिंकले आणि 4 सामने गमावले. त्याचे 12 गुण आहेत. त्यांच्या शेवटच्या सामन्यात हैदराबादने गुणतालिकेत अव्वल असलेल्या राजस्थानचा थरारक सामन्यात अवघ्या 1 धावांनी पराभव केला होता.

T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ल्याचा धोका..! पाकिस्तानातून मिळाली धमकी

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर, सनरायझर्स हैदराबाद आता मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध विजय मिळवून गुणतालिकेत आपले स्थान भक्कम करण्याचे लक्ष्य ठेवेल. या मोसमात त्यांनी मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे.

दरम्यान, आयपीएलच्या इतिहासात हैदराबाद आणि मुंबई यांच्यात आतापर्यंत 22 सामने खेळले गेले आहेत. यातील हैदराबादने 10 सामने जिंकले तर मुंबईने 12 सामने जिंकले आहेत.