IPL 2024 (PBKS vs MI Match 33) : रोहित शर्मा रचणार इतिहास, धोनीनंतर ‘हा’ आकडा गाठणारा ठरणार दुसरा खेळाडू…

Rohit Sharma IPL Record : रोहित शर्मा पहिल्या सत्रापासून म्हणजेच 2008 पासून इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा भाग आहे. रोहित हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने आपल्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला पाच विजेतेपदं मिळवून दिली आहेत. आता हिटमॅन आयपीएलमधील त्या ऐतिहासिक आकडेवारीला स्पर्श करणार आहे, जिथे आतापर्यंत फक्त एमएस धोनीच पोहोचू शकला आहे. विराट कोहलीही या खास आकडेवारीपासून दूर आहे.

खरंतर, आज (18 एप्रिल, गुरुवार) IPL 2024 चा 33वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. या सामन्याद्वारे मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 250 वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत फक्त एमएस धोनीने 250 सामने खेळण्याचा टप्पा ओलांडला आहे. धोनीने या स्पर्धेत आतापर्यंत 256 सामने खेळले आहेत.

रोहित शर्माने आतापर्यंत 249 सामने खेळले आहेत. अशा परिस्थितीत तो आज पंजाबविरुद्ध 250व्या आयपीएल सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर तो या स्पर्धेत आतापर्यंत 244 सामने खेळला आहे. कोहली अजूनही 250 सामन्यांच्या अंकापासून दूर आहे. अशा स्थितीत धोनीनंतर या विशेष आकड्याला स्पर्श करणारा रोहित शर्मा हा दुसरा खेळाडू ठरणार आहे.

IPL 2024 (PBKS vs MI Match 33) : मुंबईसमोर आज पंजाबचे आव्हान, प्लेऑफच्या स्पर्धेसाठी अत्यंत महत्वाची लढत…

रोहित शर्माची आत्तापर्यंतची आयपीएल कारकीर्द…

2008 मध्ये म्हणजेच पहिल्या सत्रात आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या रोहित शर्माने आतापर्यंत 249 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 244 डावात फलंदाजी करताना त्याने 30.1 च्या सरासरीने आणि 131.22 च्या स्ट्राईक रेटने 4 हजार 932 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 2 शतके आणि 2 अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने गोलंदाजीत 15 विकेट्स देखील घेतल्या आहेत.

Success Story : टीम इंडियात पदार्पण करण्यापूर्वीच क्रॅक केली होती UPSC परीक्षा…! सचिन-गांगुली-द्रविडशी आहे खास कनेक्शन, जाणून घेऊया कोण आहे ‘तो’ क्रिकेटर….

उल्लेखनीय आहे की, रोहित शर्मा आयपीएलमध्ये खेळणाऱ्या अशा खेळाडूंमध्ये सामील आहे, ज्याने गोलंदाजीत विकेट्सची हॅटट्रिक घेतली आहे आणि फलंदाजी करताना शतक झळकावले आहे. रोहित शर्मा आतापर्यंत डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये खेळला आहे. सध्या तो मुंबई इंडियन्सचा एक भाग आहे.