IPL 2024 (#RCBvsKKR Match 10) : कोहलीची झंझावाती खेळी; आरसीबीचे कोलकातासमोर 183 धावांचे लक्ष्य…

Live Cricket Score, RCB vs KKR, Indian Premier League 2024 : आज आयपीएल 2024 चा 10 वा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 6 गडी गमावून 182 धावा केल्या असून कोलकात्यासमोर 183 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

आरसीबीसाठी किंग कोहलीने 59 चेंडूत 83 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 4 षटकार आले. दिनेश कार्तिकही शेवटी चमकला. कार्तिकने अवघ्या 8 चेंडूत तीन षटकारांच्या मदतीने 20 धावा केल्या. केकेआरचा मिचेल स्टार्क पुन्हा एकदा चांगलाच महागडा ठरला. स्टार्कने चार षटकात एकही विकेट न घेता 47 धावा दिल्या.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेल्या आरसीबीची सुरुवात खराब झाली कारण दुसऱ्याच षटकात त्यांनी कर्णधार फाफ डू प्लेसिसची पहिली विकेट गमावली. डू प्लेसिस 1 षटकाराच्या मदतीने केवळ 08 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी कोहली आणि कॅमेरून ग्रीन यांनी 65 धावांची (42 चेंडू) भागीदारी केली, ज्याच्या मदतीने संघाने 80 धावांचा टप्पा ओलांडला. 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 33 धावा (21 चेंडू) केल्यानंतर 9व्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या ग्रीनच्या रूपाने संघाने दुसरी विकेट गमावली.

त्यानंतर कोहलीने मॅक्सवेलसह तिसऱ्या विकेटसाठी 42 धावांची (31 चेंडू) भागीदारी केली. ही भागीदारी 15 व्या षटकात संपुष्टात आली जेव्हा सुनील नरेनने मॅक्सवेलला आपला शिकार बनवले. मॅक्सवेलने 19 चेंडूंत 3 चौकार आणि 1 षटकारासह 28 धावा केल्या. यानंतर 17व्या षटकात रजत पाटीदार (03) स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर 18व्या षटकात हर्षित राणाने अनुज रावतला (03) स्लोअर चेंडूवर पायचीत केले. 151 धावांवर आरसीबीने पाचवी विकेट गमावली. यानंतर कोहली आणि दिनेश कार्तिक यांनी सहाव्या विकेटसाठी 31 (15 चेंडू) धावांची भागीदारी केली. कार्तिकने 8 षटकात 3 षटकारांच्या मदतीने 20 धावा केल्या. कोहलीने 59 चेंडूत 83 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 4 षटकार आले.

IPL 2024 (#RCBvsKKR Match 10) : ‘सुनील नरेन’च्या नावावर मोठा विक्रम, रोहित-धोनी अन् कोहलीही ‘हे’ करू शकले नाहीत…

हर्षित राणा आणि आंद्रे रसेल यांनी सर्वाधिक 2-2 विकेट घेतल्या. यादरम्यान हर्षितने 4 षटकात 39 धावा दिल्या. याशिवाय किफायतशीर असलेल्या रसेलने 4 षटकांत 29 धावा दिल्या. एक यश सुनील नरेनने 4 षटकात 40 धावा देत मिळवले. आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्कला चांगलाच फटका बसला. स्टार्कने 4 षटकात 47 धावा दिल्या.