IPL 2025 : एम.एस. धोनी पुढच्या वर्षीही आयपीएल खेळणार की निवृत्त होणार? चेन्नईचे सीईओ विश्‍वनाथन यांनी केला मोठा खुलासा…

MS Dhoni IPL Retirement :  एम.एस. धोनी कधी निवृत्त होईल हे मला माहीत नाही. हा असा प्रश्न आहे ज्याचे उत्तर फक्त धोनीच देऊ शकतो. धोनीने घेतलेल्या निर्णयांचा आम्ही नेहमीच आदर केला आहे, त्यामुळे निवृत्तीचा निर्णय आम्ही त्याच्यावरच सोडला असला तरी, तो पुढील हंगाम खेळेल अशी आशा आहे, असे मत चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन यांनी दिले आहे.

विश्वनाथन पुढे म्हणाले की, धोनीने नेहमीच त्यांचे निर्णय स्वतः घेतले आहेत आणि योग्य वेळी ते जाहीर केले आहेत. आताही तो तसाच करेल असे दिसते मात्र, चाहत्यांप्रमाणे आम्हालाही आशा आहे की तो, सीएसकेसाठी उपलब्ध असेल.

सीएसकेचे दीर्घकाळ प्रशिक्षक असलेले स्टीफन फ्लेमिंग भारताचे प्रशिक्षक होणार का? असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला होता. यावर विश्वनाथन म्हणाले, फ्लेमिंग ही जबाबदारी आत्ताच स्विकारतील असे मला वाटत नाही. कारण त्यांना वर्षातील नऊ-दहा महिने कोचिंगमध्ये गुंतणे आवडत नाही, असेही विश्‍वनाथन म्हणाले.

Team India Head Coach : रिकी पाँटिंगने भारतीय प्रशिक्षकपदाची नाकारली ऑफर.! जाणून घ्या, ‘या’ निर्णया मागील कारण…

बीसीसीआयने गेल्या महिन्यात आयपीएल संघांच्या मालकांची बैठक बोलावली होती. या वर्षी होणारा मेगा लिलाव आणि खेळाडू टिकवून ठेवण्याची संख्या यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. यंदा होणाऱ्या मेगा लिलावात कायम ठेवलेल्या खेळाडूंची संख्या वाढवण्यावर भर दिला जात आहे. आयपीएल संघ मालकांची याबाबत वेगवेगळी मते आहेत.

यावर विश्वनाथ म्हणाले, यावर आत्ता बोलणे हे खूप घाईचे ठरेल, कारण बीसीसीआयकडून आम्हाला अद्याप याबाबत कोणतीही स्पष्टता मिळालेली नाही. बीसीसीआय लवकरच याबद्दल निर्णय जाहीर करेल.

T20 World Cup 2024 : नेपाळच्या लामिछाने समोर आणखी एक नवीन अडचण; टी-20 विश्वचषक खेळण्याचे स्वप्न होणार भंग…

धोनीची यंदाची कामगिरी…

धोनीने चालू हंगामातील 14 सामन्यांत 161 धावा केल्या आहेत. त्याने 220.54 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. धोनीने या मोसमात 14 चौकार आणि 13 षटकार देखील मारले.