#IPL2023 #Final #CSKvGT : फायनलपूर्वी अहमदाबादमध्ये मुसळधार पाऊस; पावसामुळे टॉसला विलंब, पहा Video…

अहमदाबाद – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाचा अखेरचा म्हणजेच विजेतेपदाचा सामना आज (दि.28) अहमदाबाद येथे रंगणार आहे. 31 मार्चपासून सुरू झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम लढतीत हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स व महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने आले आहेत.

पंड्याच्या गुजरातने गेल्या वर्षीच्या पदार्पणानंतर यंदा सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. तर, धोनीचा चेन्नई संघ पाचव्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे.

आयपीएल फायनलमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे टॉस अजून झालेला नाही. पावसामुळे टॉसला उशीर होत आहे.

दरम्यान, या मैदानावर गुजरात आणि मुंबई इंडियन्स यांच्यात क्वालिफायर-2 खेळला गेला तेव्हाही पावसामुळे सामना लांबला आणि टॉसला 45 मिनिटे उशीर झाला होता.

चेन्नईच्या संघाने मुंबई इंडियन्सनंतर सर्वाधिक चार वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले असून गुजरातचा संघ सलग दुसरे विजेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करेल. दोन्ही संघ तूल्यबळ असले तरीही गुजरातच्या संघाकडे शुभमन गिलसारखा प्रचंड भरात असलेला फलंदाज असल्याने त्यांचे पारडे जड राहण्याची शक्‍यता आहे. मात्र, धोनीचे नेतृत्व ही चेन्नईची जमेची बाजू असल्याने हा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार ठरेल अशी शक्‍यता आहे.