#IPL2020 : किंग्ज इलेव्हनच्या प्रशिक्षकपदी जाफरची निवड

नवी दिल्ली : भारताचा माजी फलंदाज वसीम जाफर याची आयपीएलच्या आगामी सत्रात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.

सध्या विदर्भाकडून रणजी ट्राफी खेळणा-या वसीम जाफर याने २००० ते २००८ च्या दरम्यान भारताकडून ३१ कसोटी सामने खेळले आहेत. यात ५ शतके आणि ११ अर्धशतकांसह त्याने १९४४ धावा काढल्या आहेत.

२००६ मध्ये एक व्दिशतक देखील झळकावले आहे. तसेच ८ वर्षाच्या कारकिर्दीत त्याने २ एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व देखील केले आहे.

वसीम जाफर हा २५४ प्रथम श्रेणी सामने खेळला असून त्याने १९,१४७ धावा केल्या आहेत. यात ५७ शतकांचा समावेश आहे. तर तो १५० रणजी सामने खेळणारा पहिला खेळाडू आहे. यापूर्वी २००८ मध्ये त्याने आयपीएलमध्ये सहा सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाते प्रतिनिधित्व देखील केले आहे.

 

Leave a Comment