#IPL2021 : दमदार खेळीनंतर, भर मैदानात हात जोडून पोलार्डने केलं वडिलांना वंदन

नवी दिल्ली – किरॉन पोलार्डच्या  वादळी अर्धशतकाच्या जोरावर काल मुंबई इंडियन्स संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्स संघावर ४ गडी राखून रोमांचक विजय मिळवला. मधल्या फळीतील पोलार्डने चेन्नईच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई करताना आयपीएलच्या या हंगामातील १७ चेंडूंत वेगवान अर्धशतक ठोकलं. त्याने ३४ चेंडूंत ६ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद ८७ धावा केल्या.

सध्या किरॉन पोलार्डच्या या झंझावाती खेळीचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. दरम्यान, पोलार्डने हे शतक अर्धशतक आपल्या वडिलांना अपूर्ण केलं आहे. त्याचे कारण सुद्धा तसेच आहे. आपली खेळी संपल्यानंतर पोलार्डने बॅट, हेल्मेट काढून जमिनीवर ठेवले आणि हात जोडून आकाशाकडे पाहून डोळे घट्ट मिटून उभा राहिला. आणि पोलार्डने आपलं हे अर्धशतक आपल्या पित्याला अर्पण केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kieron Pollard (@kieron.pollard55)

काही दिवसांपूर्वी पोलार्डच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यानंतर २४ मार्च रोजी पोलार्डने एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये तो म्हणाला.. “शांतपणे आणि सन्मानाने स्थिरावा. नेहमीच प्रेम राहील. अनेकांची मनं जिंकली. तुम्हाला नेहमीच माझा अभिमान वाटेल. आता उंच मुलगा नाही. मला माहित आहे की आपण एका चांगल्या ठिकाणी आहात’ असं तो म्हणाला.

वडिलांच्या जाण्याने किरॉन पोलार्ड बऱ्याच दिवसांपासून हताश होता. त्यामुळे यंदाच्या आयपील हंगामात तो म्हणावा तसा फॉर्म मध्ये न्हवता. मात्र कालच्या खतरनाक खेळीतून पोलार्डने आपल्या पित्याला वंदन करत पुन्हा एकदा चात्यांचे प्रेम जिंकले आहे.