#IPL2023 #RCBvMI : बेंगळुरूचा गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या…दोन्ही संघांचे प्लेइंग-11

बेंगळुरू :- आयपीएलच्या पाचव्या सामन्यात पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा (MI) सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB)शी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या मोसमात प्रथमच भारताचे दोन दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली आमनेसामने येणार आहेत.

तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या बाजूनं लागला आहे. बेंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने गोलंदाजीचा निर्णय (Royal Challengers Bangalore won the toss and elected to field) घेत मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.

#IPL2023 #RCBvMI : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने टाॅस जिंकला, कर्णधार डुप्लेसिसने घेतला ‘हा’ निर्णय

फाफ डुप्लेसिस व्यतिरिक्त, आरसीबीने ग्लेन मॅक्सवेल, रीस टोपले आणि मायकेल ब्रेसवेल या चार परदेशी खेळाडूंचा समावेश केला आहे. त्याचबरोबर रोहित शर्माने जोफ्रा आर्चर, जेसन बेहरेनडॉर्फ, टिम डेव्हिड आणि कॅमेरून ग्रीनची निवड केली आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11 खालीलप्रमाणे –

 रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) : विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मायकेल ब्रेसवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, हर्षल पटेल, आकाश दीप, रीस टोपले, मोहम्मद सिराज.

मुंबई इंडियन्स ( #MI ) :  रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, कॅमेरून ग्रीन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, निहाल वढेरा, हृतिक शोकीन, पीयूष चावला, जोफ्रा आर्चर, अर्शद खान.

दरम्यान, बंगळुरू आणि मुंबई यांच्यात खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यांची एकूण आकडेवारी पाहिली, तर मुंबईचा संघ खूप पुढे आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 30 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये आरसीबीने 13 तर मुंबईने 17 सामने जिंकले आहेत.परंतु अखेच्या 5 सामन्यांकडे पाहिल्यास बंगळुरूचे पारडे जड दिसते. कारण दोन्ही संघांतील गेल्या पाच सामन्यांत मुंबई संघाला केवळ एकच सामना जिंकता आलेला आहे.