‘आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही हीच चूक आहे का?’ दादांच्या वक्तव्यावर रोहित पवार म्हणाले,’प्रतिभा आजींना हा प्रश्न विचारायला हवा..’

मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या गटाने बुधवारी शरद पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. तसेच अजित पवार पक्षाचे नवे अध्यक्ष असल्याचा प्रस्तावही पारित केला. अशात बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली ‘आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही हीच चूक आहे का?’ असा प्रश्न विचारत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

अशात पत्रकाराने रोहित पवार यांना प्रश्न विचारला ‘आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही हीच चूक आहे का?’ त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला यावर ते म्हणाले,’जर कधी संधी मिळाली तर प्रतिभा आजींना हा प्रश्न विचारायला हवा राहिला प्रश्न कुठं जन्मायचा  माझे आई वडील आणि आजोबा राजकारणात तर मी काय करायचं ? कस असत दादांमध्ये खूप मोठी क्षमता आहे मला भीती फक्त एवढीच वाटते एक पुतण्या म्हणूनकि भाजप ला कधीही लोक नेते चालत नाही भाजपने एका वर्षभरात शिंदे साहेबांचा गेम केला राहिला प्रश्न सुप्रिया ताईचा तर दादांनी भाषणात म्हटले की,’ आम्ही ४ वर्षांपासून भाजप सोबत बोलत होतो. त्यामुळे ताईचा प्रश्न येत नाही.’ असेही रोहित पवार म्हणाले आहे.