#ISL2020: मुंबईचा हैदराबादवर 2-1 ने विजय

मुंबई : मुंबई सिटी एफसीने मोदू सोगूच्या दोन गोलाच्या जोरावर इंडियन सुपर लीगमध्ये रविवारी हैदराबाद एफसीचा 2-1 ने पराभव करत विजय नोंदवला. मुंबईचा आपल्या घरच्या मैदानावरचा हा पहिला विजय आहे.

मोदू सोगूने ६ व्या मिनिटाला गोल करत मुंबईला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुस-या सत्रात 78 व्या मिनिटाला सोगूने दुसरा गोल करत मुंबईला 2-0 ने आघाडीवर नेले. हैदराबादकडून बोबो याने 81 व्या मिनिटाला एकमेव गोल केला. या सामन्यात मुंबईच्या सार्थक गोलुईला 67 व्या मिनिटाला दुसरे पिवळे कार्ड मिळाल्याने मुंबईच्या संघाला दहा खेळाडूसोबत खेळावे लागले.

या विजयासह मुंबईचे 10 सामन्यात 16 गुण झाले आहेत. ते गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहचले आहे. तर हैदराबादचे 10 सामन्यात 5 गुण असून ते गुणतालिकेत 10 व्या स्थानावर आहेत.

 

Leave a Comment