मुलं बिघडत असल्याची ही 5 लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नका

पालकांना त्यांच्या मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची असते.  मुलांच्या आनंदासाठी ते सर्व काही करतात.  मुलंही आपल्या आई-वडिलांवर खूप प्रेम करतात आणि त्यांचे म्हणणे ऐकतात. पण जेव्हा मुलं मोठी होऊन कुटुंबाबाहेर जातात, तेव्हा त्यांची समाजातील इतर लोकांशी ओळख वाढते.  त्यांची शाळा किंवा कॉलनीत अन्य मुलांसोबत मैत्री होते.  ते मित्र बनवतात तसेच शिक्षक, बस किंवा रिक्षाचालक, दुकानदार इत्यादींच्या संपर्कात येतात.

मात्र मुले अनेकदा चुकीच्या संगतीत येतात आणि चुकीच्या गोष्टी शिकू लागतात.  त्यांच्या वागण्यात बदल होतो.  कधीकधी मुले अपमानास्पद शब्द बोलायला शिकतात.  लहान वयातच मुले धूम्रपान करायला लागतात.  शाळेचे तास बंक्स करून बाहेर फिरू लागतात. आपले मूल बिघडणार नाही ना, अशी भीती प्रत्येक पालकाला असते.

अशा परिस्थितीत तुमचं मूल कुठल्या चुकीच्या संगतीत आहे का किंवा मूल बिघडलं तर नाही ना, हे जाणून घेण्याचे काही मार्ग आहेत.  या लक्षणांद्वारे मुलाची बिघडलेली स्थिती ओळखा, जेणेकरून मुले चुकीच्या मार्गावर जाऊ नय

* मुलाकडून चुकीच्या भाषेचा वापर

आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम मुलांवर लवकर होतो.  मुले कधी कधी काही गोष्टी फक्त बघून शिकतात.  मुलांनी कधी कोणाला शिवीगाळ करताना ऐकले असेल, तेव्हा तेही शिवीगाळ करायला शिकतात. ते चुकीचे शब्द वापरून शिवीगाळ करू लागतात किंवा बोलू लागतात.  तुम्ही तुमच्या मुलाच्या भाषेकडे लक्ष दिले पाहिजे. जर मुलाने गैरवर्तन करण्यास सुरुवात केली तर त्याला ताबडतोब रोखा आणि योग्य व अयोग्य यातील फरक सांगा.  मुले अशी भाषा कोठून शिकतात हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

* मुलांचे इतरांना त्रास देणे 

अनेक मुले इतरांना छेडतात आणि त्रास देतात.  पण जर ते अनेकदा असे करत असतील आणि त्यांना इतरांना त्रास देण्यात मजा येत असेल, तर समजून घ्या की तुमच्या मुलाचे वागणे योग्य नाही.  ही वाईट सवय सुधारण्यासाठी मुलाला समजावून सांगा जेणेकरून तो इतरांना त्रास देणे थांबवेल.

* मुलांचे वारंवार भांडण

कुटुंबात मुलांमध्ये भांडणे होणे ही बाब सर्रास आहे, पण जर मुल अनेकदा आपल्या मोठ्या भावाला आणि बहिणीशी भांडत असेल किंवा मारहाण करत असेल, त्याशिवाय तो दररोज शेजारच्या मुलांशी भांडत करतोय, त्याच्या भांडणाची शाळेत तक्रार केली जातेय तर मूल बिघडत आहे हे समजून घेतले पाहिजे. त्याच्या अशा वागण्याचे कारण शोधा आणि सुधारण्याचा प्रयत्न करा

* चोरी सुरू करणे

जर तुमच्या मुलाने मित्राकडून काहीतरी आणले किंवा घरातून वस्तू आणि पैसे गायब झाले तर समजून घ्या की मूल चुकीच्या मार्गावर जात आहे.  तो चोरी करायला शिकतोय. त्याचे छंद आणि आवडीनिवडी वाढत आहेत.  आपला उदरनिर्वाह करण्यासाठी ते चोरी करू लागतात.  अश्यावेळी मूल कोणाच्या संगतीत आहे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

* मुलांचा हट्टीपणा

प्रत्येक मुलं थोडंफार हट्ट करतात. पण जेव्हा मुल मर्यादेपेक्षा जास्त हट्ट करू लागतं, तेव्हा ते त्याच्या बिघडण्याचं लक्षण आहे. त्याचा हट्ट पूर्ण करण्यासाठी तो खाणे बंद करतो, खूप रडतो, स्वत:ला इजा करतो,  असे आढळले तर तो बिघडतोय हे त्याच्या वागण्यातून समजून घ्या.  त्याची आज्ञा पाळण्याऐवजी गरज असेल तेव्हा कठोर व्हा. आणि त्याला समजावून सांगा.