मनपाकडून होणाऱ्या कामांवर लक्ष देण्याचे काम अधिकारी-पदाधिकाऱ्यांचे : उपमहापौर ढोणे

नगर  – पावसाळ्या पूर्वी नगर शहरात मनपा मार्फत सर्व नाल्यांची सफाई करून गाळ काढण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, नाले सफाई नझाल्याने पावसाळ्यात अनेकांच्या घरात पाणी शिरल्याच्या तक्रारी येतात. त्यासाठी शहरात विविध भागात सुरु असलेले नालेसफाईच्या कामांची पाहणी करत आहे. तसेच मनपामार्फत होणाऱ्या प्रत्येक कामांची पाहणी करून अधिकारी, पदाधिकारी यांनी लक्ष देण्याचे काम करावे असे, आवाहन उपमहापौर मालन ढोणे यांनी केले.

प्रभाग क्रमांक पाच मधील कुष्ठधाम रोड येथील नालेसफाई कामाची पाहणी उपमहापौर मालन ढोणे केली. यावेळी भाजप शहर जिल्हाअध्यक्ष भैय्या गंधे, नगरसेवक मनोज दुलम, नगरसेविका सोनाबाई शिंदे, उदय कराळे, सतीष शिंदे, मनपा अधिकारी सुरेश इथापे, अर्जुन जाधव, अशोक रकटे, संजय ढोणे, अभिजित ढोणे, मनोज पारखे उपस्थित होते.

यावेळी उपमहापौर म्हणाल्या की, नगर शहराच्या विकासाचे एकेक प्रश्न हाती घेऊन ते पूर्ण करणार आहे. नागरिकांनी नगर शहर कायम स्वरुपी स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी मदत करावी. महापालिका प्रशासन आपले काम करतच आहे. परंतु त्यात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. शहरातील नाले सफाई पावसाळ्यापूर्वी केली जाणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

यावेळी भाजप शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे म्हणाले की, जीवनात कामे होत राहतील. शासनाने दिलेल्या सुचना व करोनाचे नियम कठोरपणे नगरकरांनी पाळावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Leave a Comment