हे मस्तच झालं! आता तुम्ही मोबाईलवरही तुमच्या आवडत्या भाषेत मेलचे भाषांतर करता येणार; Gmail चे नवीन फिचर लॉन्च

नवी दिल्ली : गुगलने आपल्या जीमेल l ऍपसाठी एक नवीन फिचर आणले आहे. या फिचरच्या माध्यमातून यूजर्सना ईमेलचे भाषांतर करण्यात येणार आहे. नवीन फीचरच्या मदतीने यूजर्स आपल्याला हव्या असलेल्या भाषेत ईमेलचे भाषांतर करू शकणार आहेत. हे फिचर मोबाईल जीमेल यूजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. हे फिचर, पूर्वी फक्त वेबवर उपलब्ध होते, आता Android आणि iOS डिव्हाईससाठी उपलब्ध झाले आहे.

गुगलने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अनेक वर्षांपासून, यूजर्सना 100 हून अधिक भाषांमध्ये वेबवर Gmail मधील ईमेल सहजपणे भाषांतरित करण्याची सुविधा देण्यात आली आहे. आजपासून हे फिचर Gmail मोबाईल अॅपसाठी देखील जारी करत आहोत.” आम्‍ही नेटिव्ह ट्रान्सलेट इंटिग्रेशनची घोषणा करताना फार आनंदी आणि उत्‍साहित आहोत. याच्या माध्यमातून तुम्‍हाला कोणत्याही त्रासाशिवाय एकाहून अधिक भाषांमध्‍ये संवाद साधण्‍यास मदत होईल.” असं म्हटलं आहे.

एकाच टॅपमध्ये भाषांतर होईल

हे फिचर ईमेल कंटेटची भाषा डिक्टेक्ट करते आणि त्याला टॉप बॅनरवर डिस्प्ले करते. त्यानंतर यूजर्स आपल्या आवडीच्या भाषेत सिंगल टॅपमध्ये भाषांतर करू शकतात. उदाहरणार्थ, ईमेल इंग्रजीत असल्यास आणि यूजर्सची भाषा हिंदी असल्यास, ट्रान्सलेटेड मजकूर पाहण्यासाठी तुम्ही “हिंदीमध्ये भाषांतर करा” वर टॅप करू शकतात. या ठिकाणी तुम्हाला ईमेलचे हिंदीमध्ये भाषांतर झालेले दिसेल.

तसेच, जर यूजर्स ईमेलचे भाषांतर करू इच्छित नसतील, तर ते वर पाहिलेले बॅनल काढून टाकू शकतात. एवढेच नाही तर, यूजर्सना विशिष्ट भाषेतील ईमेलचे भाषांतर न करण्याची सुविधाही मिळणार आहे. यूजर्स सेटिंग पर्यायावर जाऊन आपल्याला कोणत्या भाषेत ईमेलचे ट्रान्सलेशन करायचे आहे त्यानुसार भाषा निवडू शकतात.

Gmail भाषांतर फिचर कसे वापरा?

* मेसेजचे भाषांतर करण्यासाठी, तुमच्या ईमेलच्या टॉपवर “अनुवाद करा” पर्यायावर क्लिक करा.
* तुम्हाला मूळ भाषेत ईमेल वाचायचा असल्यास तुम्ही भाषांतर पर्याय डिसमिस देखील करू शकता.
* जेव्हा Gmail ला निर्दिष्ट केलेल्या भाषेपेक्षा भिन्न ईमेलचा मजकूर आढळतो तेव्हा हे बॅनर पुन्हा दिसेल.
* एखाद्या विशिष्ट भाषेसाठी भाषांतर बॅनर बंद करण्यासाठी, तुम्हाला “पुन्हा भाषेचे भाषांतर करू नका” वर टॅप करणे आवश्यक आहे.
* सिस्टीम इतर कोणतीही भाषा शोधू शकत नसल्यास, तुम्ही (i) बटण (तीन ठिपके) वर टॅप करून स्वत: भाषांतर करू शकता.