पाऊस आला रेऽऽ !!!! नगर शहरासह उपनगरात पावसाची हजेरी

नगर – मान्सूनपूर्व पावसाने हुलकावणी दिल्याने कडधान्य पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. याचा थेट परिणाम मूग आणि उडीदावर होणार आहे. दरम्यान आज नगर शहरासह उपनगरात काही भागात पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे काहीवेळ दमटपणा जाणवला. ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात वाढ झाली नाही. मात्र, पुढील दोन दिवस मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज होण्याची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.

आज नगर शहरासह केडगाव, सावेडी उपनगर परिसरात काही भागात पावसाचा शिडगाव झाला. दरम्यान, मृग नक्षत्र जवळपास कोरडा गेल्याने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. पाऊस लांबल्याने उन्हाच्या झळा वाढत असून सर्वांना वरूण राजाची प्रतिक्षा आहे. आज पावसाने काही भागात हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

या पावसाच्या शिडकावाने काहीसा दिलासा नागरिकांना मिळाला आहे. गेल्या दोन दिवसात पाऊस झाल्यास सोयाबिन, बाजरी तूर अशी पिकांची पेरणी होतील. मात्र, सध्या जिल्ह्यातील तापमानात कमालीची वाढ होत आहे.