थिएटरमध्ये जय श्री रामच्या घोषणा आणि प्रेक्षकांचा डान्स,अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ Video Viral

मुंबई – अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे. देशभरामध्ये राम भक्तांकडून विविध प्रकारे चित्रपटाचे जोरदार पद्धतीने स्वागत करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. काही ठिकाणी ‘राम सेतू’च्या स्वागतासाठी फटाके फोडण्यात आले तर काही ठिकाणी पोस्टरला हार घालण्यात आले.’राम सेतू’बाबतचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर चाहते चित्रपटाचे जोरदार कौतुक करत आहेत. इतकंच नाही तर ते थिएटरमध्येही जोरदार नाचताना दिसत आहेत. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर येत आहेत, ज्यामध्ये लोकांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अनेकजण थिएटर स्क्रिनसमोर नाचताना दिसत आहेत.त्यासोबतच बॅग्राऊंडला राम सेतू मधील राम..राम हे म्युजिक देखील सुरु आहे. त्यासोबतच अनेकजण जय श्री रामच्या घोषणाही देत आहेत.

दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांतच 26.25 कोटींची कमाई केली होती आणि आजही अनेक थिएटर्समध्ये हाऊसफुलचे बोर्ड झळकताना दिसत आहेत.