जय सिया राम.! ‘आदिपुरुष’ सिनेमातील पाहिलं गाणं प्रदर्शित; गाणं ऐकून तुमच्या अंगावर येतील शहारे…

मुंबई – साऊथ स्टार प्रभास आणि दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला होता तेव्हा मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र आता चित्रपटाच्या ट्रेलरनंतर प्रेक्षकही खुश झाले आहेत म्हणूनच सिनेमाची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

दरम्यान, अश्यातच आज सिनेमातील नवीन गाणं प्रदर्शित करण्यात आलं असून सध्या सगळीकडे याच गाण्याची चर्चा रंगताना दिसत आहे. सोशल मीडियावर देखील नेटकऱ्यांनी या गाण्याला मोठा प्रतिसाद दिल्याचं दिसत आहे. आता ‘आदिपुरुष’ मधील ‘जय श्री राम…’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

‘जय श्री राम…’ या गाण्याचे संगीत दिग्दर्शन प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी केलं आहे. तसेच मनोज मुंतशिर शुक्ला हे या गाण्याचे गीतकार आहेत. हे गाणं टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आलं आहे. सिनेरसिकांनी या गाण्याचं जोरदार कौतुक केलं आहे.

दरम्यान, अभिनेता प्रभासनं जय श्री राम हे गाणं रिलीज झाल्यानंतर एक ट्वीट शेअर केले. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, “जय श्री राम गाणं कसं वाटलं? जय श्री राम या टॅगचा वापर करुन रिप्लाय द्या’ प्रभासच्या या ट्वीटला एका नेटकऱ्यानं रिप्लाय दिला. हा सिनेमा येत्या 16 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना 3D मध्ये पाहता येणार आहे.