… तर २०२० पर्यंत जम्मू-काश्मीर वेगळा होईल – मेहबूबा मुफ्ती

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीमध्ये कलम ३७० आणि कलम ३५ अ या मुद्यावरून राजकीय वाकयुद्ध सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विशेषाधिकारचे कलम रद्द झाल्यास २०२० पर्यंत जम्मू-काश्मीर भारतापासून वेगळे करू, असे त्यांनी म्हंटले आहे. जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जागेवरून मुफ्ती यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

मेहबूबा मुफ्ती यांनी म्हंटले कि, भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी कलम ३७० आणि कलम ३५ अ नष्ट करण्यासाठी डेडलाईन देत असतील. तर आम्हीही जम्मू-काश्मीरला वेगळे करण्यासाठी एक डेडलाईन देतो. केंद्र सरकारने कलम ३७० आणि कलम ३५ अ रद्द केले तर जम्मू-काश्मीर आणि भारतातील नाते संपुष्टात येईल. जम्मू-काश्मीरसाठी कलम ३७० एका पुलासारखे आहे तोच पूल जर तुम्ही नष्ट केला तर गंभीर परिणाम होतील, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कलम ३७० आणि  कलम ३५ अ याना संविधानिक अडथळा म्हंटले होते.

Leave a Comment