लाल साडीत जान्हवी सेम टू सेम श्रीदेवी!

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर कायम फोटो शेअर करत असते. अशातच जान्हवीने आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात ती आई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्याशी मिळती-जुळती दिसत आहे. जान्हवीच्या या अदानी चाहते भलतेच घायाळ झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

Saree dreams coming true ? #sarinotsorry

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on


जान्हवीने साडीतील आपले सुंदर असे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मुंबईत पार पडलेल्या एका इव्हेंटसाठी जान्हवीने हा साडीतील लूक कॅरी केला होता. यात ती खूपच स्टायलिश दिसत आहे. एकीकडे फॅन्स तिचे भरभरून कौतुक करत आहेत. तर काही फॅन्स ती श्रीदेवींची कॉपी असल्याचे म्हटले आहेत. दरम्यान, जान्हवीने धडकमधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते.

 

View this post on Instagram

 

Can I live in a saree forever!!! ??????✨?

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on


यात तिच्यासोबत शाहीद कपूरचा भाऊ ईशान खट्टर झळकला होता. या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर चांगले यश मिळविले होते. याव्यतिरिक्‍त नेटफ्लिक्‍सवरील घोस्ट स्टोरीदमध्येही ती झळकली होती. जान्हवी सध्या आपल्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती करण जौहरचा तख्तमध्ये दिसून येणार आहे. याशिवायही तिच्याकडे अनेक चित्रपट असल्याचे समजते.

Leave a Comment