घोस्ट स्टोरीजमध्ये ‘या’ अभिनेत्यासोबत जान्हवी दिसणार प्रमुख भूमिकेत

लस्ट स्टोरीजनंतर आता नेटफ्लिक्‍स भुतांवर आधारीत लघू चित्रपटांची सीरिज घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नाव घोस्ट स्टोरीज ठेवण्यात येणार आहे. यातल्या एका लघूपटाच दिग्दर्शन झोया अख्तर करणार आहे. त्यात जान्हवी कपूर आणि विजय वर्मा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या लघूपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असल्याची माहिती देखील मिळाली आहे.

नुकतेच जान्हवी कपूरने झोया अख्तरची भेट घेतली होती. त्या नंतर हे दोघे एकत्र काम करणार याची चर्चा सुरू झाली होती. त्यातच या भेटीनंतर झोया अख्तरने इन्स्टाग्राम पोस्टवर नेटफ्लिक्‍सच्या आगामी प्रोजेक्‍टची माहिती दिली. झोया अख्तर जान्हवीसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे.

“घोस्ट स्टोरीज’ मध्ये लस्ट स्टोरीज प्रमाणेच एकूण चार लघूपटांची श्रृंखला असणार आहे. या चार लूघपटांचे दिग्दर्शन झोया अख्तर, अनुराग कश्‍यप, करण जोहर आणि दिबाकर बॅनर्जी करणार आहेत. यापूर्वी चौघांनी नेटफ्लिक्‍सच्या ‘लस्ट स्टोरीज’साठी एकत्र काम केले होते. या व्यतिरीक्त जान्हवी गुंजन सक्‍सेना यांच्या बायोपिकमध्ये दिसणार असून त्यानंतर ती रुह अफ्जा, दोस्ताना 2, तख्त यांसारख्या चित्रपटातही ती झळकणार आहे.

Leave a Comment