ऑस्ट्रेलिया, जपानमध्येही करोनाच्या नव्या स्ट्रेनचा धुमाकूळ

टोकियो : करोनाचा नवा स्ट्रेन आढळल्यामुळे जगभरात चिंताव्यक्त केली जाते आहे.नव्या स्ट्रेनमुळे करोना बाधितांचा आकडा वाढत आहे. करोनाबाधिताच्या संख्येमुळे अनेक देशामधून निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. वाढत्या बाधिताच्या संख्येमुळे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी नवीन निर्बंध लागू केले आहेत. तर दुसरीकडे जपानमध्ये आरोग्यविषयक आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेनमध्ये तीन दिवस लॉकडाउन लादण्यात येत आहे. ब्रिटनमधील हॉटेल क्लीनरमध्ये नवीन कोरोना विषाणूची लक्षणे आढळून आली आणि त्यानंतर ब्रिस्बेन आणि आसपासच्या भागात तीन दिवसांचा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.

पुढील तीन दिवस लोकांनी आपल्या घरात रहावे, सरकारला सहकार्य करावे, असे या निर्देशात म्हटले आहे. जर फार महत्वाचे काम असेल तरच बाहेर जा आणि तरीही मास्क आणि इतर काळजी घ्या. तीन दिवसांचा लॉकडाऊन योग्य पद्धतीने न पाळल्यास तीस दिवसही लागू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे.

जपानमध्येही कोरोना विषाणूच्या नव्या ताणामुळे आरोग्य आपत्कालीन स्थिती जाहीर झाली आहे. येथे लोकांना कमी घराबाहेर पडा, मास्क वापरायला सांगितले गेले आहे. शुक्रवारीपासून सुरु झालेली हि आरोग्य आणीबाणी 7 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी, रेस्टॉरंट्ससह इतर दुकाने रात्री 8 पर्यंत बंद करावी लागतील, संध्याकाळी 7 नंतर मद्यपान केले जाणार नाही. तथापि, हे नियम फक्त टोकियोसह जवळील तीन शहरांमध्ये लागू होतील. युनायटेड किंगडममध्ये कोरोना विषाणूचा एक नवीन स्ट्रेन प्रथम सापडला. जो नंतर प्रथम युरोपमध्ये पसरले, त्यानंतर अमेरिका, भारत यासारख्या देशांमध्येही त्याचा प्रभाव दिसून आला. भारतातही कोरोनासंबंधी नवीन स्ट्रेन संबंधित 80 पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

Leave a Comment