जेफ बेझोसदेखील गेले अंतराळात

व्हॅन हॉर्न, (अमेरिका) – ब्लू ओरिजिन आणि अमॅझोनचे संस्थपक जेफ बेझोस हे आज आपल्या स्वतःच्या अंतराळ संस्थेच्या रॉकेटमधून अंतराळ प्रवासाला जाऊन आले. 

आज वेस्ट टेक्‍सासमधून त्यांनी या अंतराळ प्रवासाची सुरूवात केली होती. त्यांच्या या अंतराळ प्रवासाची उंची आतापर्यंची सर्वाधिक उंची होती. त्यादृष्टीने ह एक ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे.

बेझोस यांच्या समवेत त्यांचे बंधू मार्क बेझोस, नेदरलॅन्डमधील 18 वर्षीय भौतिकशास्त्राचा विद्यार्थी ओलिव्हर डेमेन आणि टेक्‍सासमधील 82 वर्षीय हवाई वाहतूक तज्ञ महिला वॅली फंक याही होत्या. या अंतराळ प्रवासावर जाणारे सर्वात कमी आणि सर्वात जास्त वय असलेले सहप्रवासी बेझोस यांच्या समवेत होते.

या निवडक सहप्रवाशांना घेऊन ब्लू ओरिजिनचे न्यू शेपार्ड हे रॉकेट आज (मंगळवारी) अवकाशात झेपावले. अपोलो 11 हे अंतराळ यान चंद्रावर उतरल्याच्या ऐतिहासिक घटनेला आज 52 वर्षे पूर्ण झाली.आहेत. याच निमित्ताने बोझोस यांची ही अंतराळ यात्रा आजच्या दिवशी निश्‍चित केली होती.

बेझोस हे अंदाजे 66 मैल (106 किलोमीटर) उंचीवर गेले. रिचर्ट ब्रॅनसन यांन 11 जुलै रोजी अंतराळात अशीच सफर केली होती. त्यांच्यापेक्षा बेझोस यांचे रॉकेट 10 मैल (16 किलोमीटर) अधिक उंचीवर गेले.

बेझोस यांच्या रॉकेटला जोडलेली कॅप्स्यूल पूर्णपणे स्वयंचलित होती. त्यामुळे पूर्ण प्रशिक्षित चालक कर्मचाऱ्याची त्यांना आवश्‍यकता नव्हती. अंतराळातील गुरुत्वाकर्षण शून्य होते त्या “कार्मन लाईन’पर्यंत हे सर्वजण गेले आणि परत आले. त्यांचा हा प्रवास केवळ 11 मिनिटांचा होता. सर्वोच्च उंचीवर पोहोचल्यावर 3-4 मिनिटे या सर्वांनी वजन शून्यतेचा अनुभव घेतला. वेस्ट टेक्‍सासमध्ये त्यांचे अंतराळ यान सुखरूप इतरले आणि बेझोस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या मोहिमेच्या यशस्वितेबद्दल आनंदोत्सव साजरा केला.