Jharkhand Train Accident | हायस्पीड ट्रेनने प्रवाशांना उडवले, अधिकाऱ्यांनी सांगितले अपघाताचे कारण

Jharkhand Train Accident | झारखंडमधील जामतारा येथे  रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने जाणारी ट्रेन लोकांच्या अंगावर आली. या अपघाताबाबत माहिती देताना जामतारा उपायुक्त म्हणाले की, ‘जामतारा येथील कालाझरिया रेल्वे स्थानकावर वेगवान ट्रेनने धडक दिल्याने काही लोकांचा मृत्यू झाला. मृतांचा नेमका आकडा समोर आला नाहीये. वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या असून मदतकार्य सुरू आहे. राष्ट्रपती मुर्मू, पीएम मोदी आणि सीएम सोरेन यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.’

 

‘झारखंडमधील जामतारा येथे झालेल्या दुर्घटनेने दु:ख झाले. माझे विचार त्या सर्वांसोबत आहेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत. मी जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्याची आशा करतो.” असे ट्विट पीएमओ कार्यालयाने केले आहे.

झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी ट्विट केले की, “जामतारा येथील कलझारिया स्टेशनजवळ झालेल्या रेल्वे अपघाताच्या दु:खद बातमीने ह्रदय हादरले आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि शोकाकुल परिवाराला या दु:खाच्या वेळी सहन करण्याची शक्ती देवो. प्रशासनाचे पथक घटनास्थळी मदत आणि बचाव कार्यात करत आहे. अपघातात जखमी झालेल्यांना लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे.”

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे. याबाबत रेल्वेचे म्हणणे  आहे की,’रेल्वेच्या म्हणण्यानुसार आगीची कोणतीही घटना घडली नाही.’ रेल्वेने सांगितले की, अलार्म चेन खेचल्यामुळे ट्रेन क्रमांक 12254 थांबवण्यात आली, तेव्हा अचानक दोन लोक रुळावर आले आणि त्यांना मेमू ट्रेनने चिरडले. ठार झालेले हे ट्रेनचे प्रवासी नव्हते, असे रेल्वेचे म्हणणे आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. जामतारा-करमाटांर येथील कलझारियाजवळ तब्बल १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे अपघातामध्ये दुर्दैवाने एवढ्या लोकांचा मृत्यू झाला.’ असेही माहिती त्यांनी दिली आहे.

हेही वाचा

#Horoscope 29 February 2024 : आजचे भविष्य ( 29 फेब्रुवारी 2024 )