हाय कमिशनरच्या मदतीने जुही चावला परतली मायदेशी 

सध्या करोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर देशात लॉकडाऊन असून प्रत्येक नागरिक घरी राहण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच विदेशात असलेली नागरिकही आपल्या घरी परतले आहेत. दरम्यान, जूही चावला भारताबाहेर सहलीवर होती. परंतु, ती हाय कमिशनरच्या मदतीने मायदेशी परतली असल्याची माहिती खुद्द जुही चावलानेच दिली आहे.

सध्या संपूर्ण जगात करोनाची दहशत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला. या अनागोंदीच्या काळात जुही चावला आपले पती जय मेहता आणि मुलांसमवेत ऑस्ट्रिया हॉलिडेवर होती. जुही म्हणाली, आम्ही सर्वजण ऑस्ट्रियामधून बाहेर पडताच सीमा देखील बंद झाल्या. त्यानंतर स्वित्झर्लंडमध्येही असेच घडले. यामुळे आम्ही परत लंडनच्या घरी परतलो.

तोपर्यंत भारतातील आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर देखील बंदी घालण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आम्ही तातडीने भारतात येण्याचा निर्णय घेतला. कारण आपले घर हे आपलेच असते आणि देशही आपलाच असतो. यासाठी जुहीने भारतातील हाय कमिशनरशी संपर्क साधला आणि भारतात परतण्याची इच्छा व्यक्‍त केली. यानंतर त्यांना सुरक्षितपणे मुंबईत आणण्यात आले. मायदेशी परतल्याने जुहीने सर्वांचे आभार मानले.

Leave a Comment